Home > मॅक्स वूमन > सुप्रिया ताई सोडणार बारामतीचा मतदारसंघ..

सुप्रिया ताई सोडणार बारामतीचा मतदारसंघ..

सुप्रिया ताई सोडणार बारामतीचा मतदारसंघ..
X

सध्या सुप्रिया सुळे आपल्या मतदारसंघात अनेक नाविन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी करताना दिसतायत. त्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सतत लोकांशी संपर्कातही राहण्याचा प्रयत्न करतायत. सुरूवातीला भाषणांमध्ये अजिबात प्रभावी नसलेल्या सुप्रिया सुळे यांच्या भाषणात आता तर लक्षणीय सुधारणा झालीय. पुणे जिल्ह्यात नुकतंच त्यांनी शालेय विद्यार्थिनींसाठी सायकलींचं वाटपही केलं, यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी थेट संवाद ही साधला. कुणाला काय बनायचंय, हेही त्यांनी आस्थेने विचारलं. त्यावेळी काही विद्यार्थिनींनी राजकारणात येण्याची इच्छाही व्यक्त केली. कुणाला आमदारकी तर कुणाला झेडपी लढायची होती. मात्र एका मुलीने थेट खासदारकी लढायची इच्छा व्यक्त केली आणि ती ही थेट सुप्रिया सुळे खासदार असलेल्या मतदारसंघातून.. मग पुढे काय झालं.. सुप्रिया सुळे सोडणार का बारामतीचा मतदारसंघ.. पाहा

Updated : 17 July 2018 2:01 PM GMT
Next Story
Share it
Top