Home > मॅक्स वूमन > भारतीय महिलांमुळे बांग्लादेश जिंकला टी-ट्वेण्टी चॅम्पिअनशीप

भारतीय महिलांमुळे बांग्लादेश जिंकला टी-ट्वेण्टी चॅम्पिअनशीप

भारतीय महिलांमुळे बांग्लादेश जिंकला टी-ट्वेण्टी चॅम्पिअनशीप
X

टी-ट्वेण्टी महिला आशियाई चॅम्पिअनशिप बांग्लादेशनं नुकतीच क्वालालंपूरमध्ये येथे जिंकली. अंतिम सामन्यात भारताच्या टिमशी झालेल्या चुरशीच्या खेळत नाट्यमय वळण घेत बांग्लादेश महिला क्रिकेट संघ जरी जिकला असला तरी बांग्लादेशच्या या यशात भारतीय महिलांचे योगदान आहे.

बांग्लादेश महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी दोन भारतीय महिला आहेत. अंजू जैन आणि देविका पळशीकर या बांग्लादेशच्या महिला क्रिकेट संघाला प्रशिक्षण देतात. सोबतच संघाचे फिजीओ म्हणून भारतीय अनुजा दळवी या काम करत आहेत. अनुजा या मूळच्या मुंबई येथील असल्याने महाराष्ट्रचाही या यशात वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही.

भारतीय महिलांची क्रिकेटमधली कामगिरी बघता महिला क्रिकेटलाही आता पुरुष क्रिकेट संघाइतके महत्व प्राप्त होइल अशी आशा करुयात.

Updated : 19 Jun 2018 2:12 PM GMT
Next Story
Share it
Top