Home > Election 2020 > प्रज्ञासिंह ठाकूरनंतर माहेश्वरी, भाजपा आमदाराचे शहीद हेमंत करकरेंबाबत वादग्रस्त ट्विट

प्रज्ञासिंह ठाकूरनंतर माहेश्वरी, भाजपा आमदाराचे शहीद हेमंत करकरेंबाबत वादग्रस्त ट्विट

प्रज्ञासिंह ठाकूरनंतर माहेश्वरी, भाजपा आमदाराचे शहीद हेमंत करकरेंबाबत वादग्रस्त ट्विट
X

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपच्या लोकसभा उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर आज सकाळी लोकसभा अध्यक्ष सुनेत्रा महाजन यांनी देखील ATS चीफ म्हणून हेमंत करकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत वादग्रस्त विधान केल्यानंतर आता भाजप आमदार माहेश्वरी यांनी शहीद हेमंत करकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

भगवा दहशतवादाच्या नावाखाली भारत देशाला बदनाम करण्याच्या कट-कारस्थानात हेमंत करकरे यांचा सहभाग होता, असं राजस्थानमधील भाजप आमदार माहेश्वर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत म्हटले आहे.

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर, देशभरातून झालेल्या टीकेनंतर प्रज्ञा यांच्या विधानावरुन भाजपाला लक्ष्य केले होते. त्यानंतर, प्रज्ञा ठाकूर यांनी आपल्या विधानबद्दल जाहीरपणे माफी मागितली होती. मात्र, त्यानंतर आता भाजपच्या नेत्यांची वारंवार वक्तव्ये येत असून या वक्तव्यावरुन नागरिक संताप व्यक्त करत आहे.

काय म्हणाल्या सुमित्रा महाजन?

कर्तव्य बजावताना एटीएस प्रमुख हेमंत करकरे शहीद झाले. पण, ATS प्रमुख म्हणून त्यांची भूमिका अयोग्य होती. दिग्विजय सिंह आणि हेमंत करकरे यांचे संबंध चांगले होते. सिंह यांनी आरएसएसवर सतत बॉम्ब बनवत असल्याचे आरोप केले होते. शिवाय, त्यांच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र एटीएसनं काही जणांना इंदूरमधून अटक केली होती.

काय म्हणाल्या होत्या प्रज्ञा ठाकूर?

प्रज्ञा यांनी दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. हेमंत करकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्यांनी केला. “तो तपास अधिकारी सुरक्षा आयोगाचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरे यांना बोलावले आणि सांगितले की पुरावे नसतानाही साध्वीला तुरुंगात का डांबले. यावर हेमंत करकरे यांनी सांगितले की, मी काहीही करेन, पण साध्वीविरोधात पुरावे सादर करणारच, मी साध्वीला सोडणार नाही”, असा आरोप प्रज्ञा सिंह यांनी केला. हेमंत करकरे याने हा देशद्रोह केला होता. तो मला विचारायचा की खरं जाणून घेण्यासाठी मला देवाकडे जावं लागेल का. यावर मी म्हटलं की तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. मी करकरे यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. त्याने मला शिवीगाळ केली होती. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी करकरे यांना मारले त्या दिवशी सुतक संपले, असे वादग्रस्त विधान प्रज्ञा सिंह यांनी केले होते.

Updated : 30 April 2019 3:38 PM GMT
Next Story
Share it
Top