News Update
Home > मॅक्स वूमन > साबुदाणा-बटाटा गुलाबजाम

साबुदाणा-बटाटा गुलाबजाम

साबुदाणा-बटाटा गुलाबजाम
X

उपासाला साधारणपणे साबुदाणा खिचडी किंवावडे बनवले जातात. किंवा फळे खाण्यकडे कल असतो. पण हेच उपासाचे पदार्थ वापरून गुलाबजामसारखी मिठाईही बनते. साबुदाणे आणि बटाटे वापरून बनवले जाणारे गुलाबजाम चवदार, खरपूस आणि रसदार बनतात.

साहित्य :

  • पाव वाटी साबुदाणा पीठ
  • १ वाटी खवा
  • १ लहान उकडलेला बटाटा
  • ३ वाट्या साखर
  • वेलदोड्यांची पूड

कृती :

१. साबुदाण्याचे पीठ करताना साबुदाणा आधी भाजून घ्यावा आणि नंतर पीठ करावे.

२. उकडलेला बटाटा किसणीवर किसून घ्यावा.

३. खव्यामध्ये किसलेला बटाटा, साबुदाण्याचे पीठ घालून चांगले एकजीव होईपर्यंत मळावे किंवा मिक्सरमधून काढावे. नंतर त्याचे छोटे- छोटे गोळे करावे.

४. एका भांड्यात १ कप पाणी, ३ कप साखर आणि वेलदोड्याची पूड घालून उकळी आणावी.

५. हे मिश्रण साधारण मिनिटभर उकळून गॅस बंद करावा. साखर पूर्ण विरघळेपर्यंत ढवळत रहावे.

६. तयार साखरेचा पाक बाजूला ठेवून द्यावा.

७. कढईत तूप किंवा तेल कडकडीत गरम करूनघ्यावे.मगकढईखालीलआच कमी करून खवा मिश्रणाचे छोटे गोळे कढईत सोडावेत. हलक्या हाताने ६-७ मिनिटे तळावेत. सोनेरी रंगाचे झाल्यावर बाहेर काढून घ्यावेत. मध्ये मध्ये हलवत राहिल्यास गुलाबजाम सर्व बाजूंनी नीट तळले जातात.

८.गुलाबजाम थंड होऊ द्यावेत आणि मगच साखरेच्या पाकात टाकावेत. नीट मुरण्यासाठी किमान २० मिनिटे पाकात बुडवून ठेवावेत.

तृप्ती गावंड

Updated : 29 Sep 2017 4:38 AM GMT
Next Story
Share it
Top