राज्यातील पहिल्या शंकरपट धुरेकरी महिला सीमा पाटील
X
मॅक्स वूमन... शोध अस्तित्वाचा या नवरात्री स्पेशलमध्ये बुलाडाणा येथील पावरबाज व्यक्ती म्हणजेच राज्यातील पहिल्या शंकरपट धुरेकरी महिला सीमा पाटील यांच्या कर्तबगारीचा आढावा घेणार आहोत.
मानवीजनसमुदायामध्ये जनावरांनी दिली साथ... त्यावर केली सीमा पाटील महिला धुरकरीने मात... जनावरांचा अत्यंत लळा असणारी धाडसी महिला म्हणजेच सीमा पाटील... मर्दानी आणि मैदानी अशी ओळख असलेला खेळ म्हणजे शंकरपट... हा खेळ प्रामुख्याने पुरुषांचा समजला जातो. आणि हा खेळ पाहणाऱ्यांच्याही अंगावर शहारे उभे राहतात. या खेळ पुरुषांचा असून महिला या खेळात आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. परंतु पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून एक महिला असून पुरुषासारखी भूमिका बजावणाऱ्या सीमा पाटील यांनी महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शंकरपट धुरेकरी महिला म्हणून मान मिळवला.
https://www.youtube.com/watch?v=4SMQeGn4o8E&t=3s