महाराष्ट्र… आणि पुरोगामी ?

343

महाराष्ट्र आणि पुरोगामी राज्य?  मला असं वाटतं की महाराष्ट्रानं ता स्वतःला पुरोगामी म्हणणं सोडून दिलं पाहिजे.  जोपर्यंत समाज मुलींना एक अडचण मानत राहणार तोपर्यंत या वृत्ती आणि डॉ. खिद्रेपुरे सारखे रॅकेट्स सुरूच राहणार आहेत. काही वर्षांपूर्वी बीडमध्ये डॉक्टर मुंडे दांपत्यावर स्त्रीभ्रूण हत्येबाबत कारवाई झाली होती. त्यानंतर आता सांगलीमध्ये हे प्रकरण पुढे आलं आहे. पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात वारंवार या घटना समोर येत आहेत. सांगलीत या प्रकरणात तर रेडिओलॉजीस्ट, गायनॅकोलॉजिस्ट, सर्जन असं मोठे रॅकेटच उघड झालंय. या भागात अनेकदा कर्नाटकातून रिपोर्ट घेऊन महाराष्ट्रात स्त्रीभ्रूण हत्या केली जाते.  जे पालक स्त्रीभ्रूण हत्या करतात त्यांच्या इतकेच उच्चशिक्षित डॉक्टर्स देखील दोषी आहेत. हे इतकं भयानक आहे कल्पना करवत नाही की मुलगी नसावी म्हणून किती खटाटोप करतात लोकं. 2009 पासून अशा किती मुली जन्माला येण्याआधीच मारल्या गेल्या याची कल्पना सुद्धा अंगावर काटा आणते. कायदे करून काही होणार नाही असं मला वाटतं. कायदे करणे किंवा बदलण्यापेक्षा वृत्ती बदला असं मला वाटतं.

रश्मी पुराणीक, राजकीय पत्रकार, एबीपी माझा