Home > Election 2020 > होय, आम्ही पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडलं – हवाई दल

होय, आम्ही पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडलं – हवाई दल

होय, आम्ही पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडलं – हवाई दल
X

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे विमान पाडल्याचा दावा केला होता. मात्र, अमेरिका आणि पाकिस्ताननं हा दावा फेटाळला होता. आज भारतीय हवाई दलानं या संदर्भातले पुरावेच पत्रकार परिषदेतून समोर आणले आहेत.

भारतानं मिग २१ या लढाऊ विमानाच्या सहाय्यानंच अमेरिकन बनावटीचं एफ१६ हे पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडल्याचा दावा भारतीय हवाई दलानं पत्रकार परिषदेत केला. या संदर्भातले पुरावेच भारतीय हवाई दलानं पत्रकार परिषदेत दाखवले आहेत. 27 फेब्रुवारी 2019 ला भारताच्या सीमेजवळ पाकिस्तानचे एफ१६ हे विमान आल्यानंतर मिग २१ या भारतीय विमानानं दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे एफ१६ हे विमान नष्ट झाल्याचे पुरावे एका व्हिडिओसह दाखवले. यात हल्ला होतांना रडार आणि इलेट्रॉनिक वेव्ह व रेडिओ तरंग लहरींचा समावेश आहे.

Updated : 8 April 2019 1:27 PM GMT
Next Story
Share it
Top