उत्तरप्रदेशमध्ये सत्तेची भाकर फिरणार का ?

पंतप्रधानपदाचा मार्ग हा उत्तरप्रदेशमधूनच प्रशस्त होत जातो, असं म्हटलं जातं. त्यामुळं उत्तरप्रदेशच्या लोकांना लोकसभा निवडणुकीविषयी काय वाटतं, गेल्या पाच वर्षांत त्यांच्या आयुष्यात काय फरक पडला, योगी सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या का, अशा दैनंदिन प्रश्नांना सामोरं जाणाऱ्या उत्तरप्रदेशमधल्या ग्रामीण भागातल्या दलित वस्त्यांमधील नागरिकांशी ‘जनतेचा जाहीरनामा’मधून संवाद साधलाय मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी मनोज चंदेलिया यांनी.