28 तारखेनंतर सरकार बदलणार का? काय म्हणाले संजय राऊत

राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार पडावं आणि उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद जावे यासाठी काहीजण देव पाण्यात घालून बसले आहेत, पण त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते मॅक्समहाराष्ट्र ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. पाहा काय म्हणाले संजय राऊत

सरकार अस्थिर करण्याचा विरोधकांचा प्रयत्न: संजय राऊत

पालघरच्या घटनेवरुन विरोधक राजकारण करत आहे. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केलाय. गुन्हे सरकारला विचारुन केले जात नाहीत, त्यामुळे विरोधकांनी विनाकारण राजकारण करु नये असा टोला राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.

उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार: संजय राऊत

राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार पडावं आणि उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद जावे यासाठी काहीजण देव पाण्यात घालून बसले आहेत, पण त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते मॅक्समहाराष्ट्र ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस ही उद्धव ठाकरेंच्या कामाचं कौतुक करत असतील: संजय राऊत

सध्या राज्यात कोरोना व्हायरस चे संकट असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अनेक क्षेत्रातील लोकांनी कौतुक केलं आहे. मात्र, सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काही ट्रेन्ड सुरु असतात. या संदर्भात संजय राऊत यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना राज्य सरकार उत्तम काम करत आहे. असं म्हणत देवेंद्र फडणवीस देखील उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत असतील.