Home > मॅक्स व्हिडीओ > धार्मिक द्वेष आणि प्रतिगामी विचारांविरोधात मॅक्स महाराष्ट्र !

धार्मिक द्वेष आणि प्रतिगामी विचारांविरोधात मॅक्स महाराष्ट्र !

धार्मिक द्वेष आणि प्रतिगामी विचारांविरोधात मॅक्स महाराष्ट्र !
X

धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या आणि प्रतिगामी परंपरा तसंच विचारधारांविरोधात मॅक्स महाराष्ट्रने सातत्याने आवाज उठवला आहे. सध्या मशिदीवरील भोंग्यांच्या वादावरुन वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाविषयी, मशिदींविषयी अफवा पसरवण्याचा प्रयत्न होतो आहे, पण एक जबाबदार माध्यम म्हणून राज्यात मॅक्स महाराष्ट्रने सर्वप्रथम मशिदींमध्ये जाऊन तिथले वास्तव मांडले. मंदिरांप्रमाणे मशिदींमध्येही पूजा अर्चा केली जाते हे दाखवले...पण त्याचबरोबर मॅक्स महाराष्ट्रने संविधानाच्या चौकटीत न बसणाऱ्या विचारधारा मग त्या कोणत्याही जातीधर्माच्या असो त्यांना विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे. कल्याणमध्ये काही मुस्लिम भगिनींशी सध्याच्या वादाच्या मुद्द्यावर आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी संवाद साधला. यावेळी बुरखा परिधान करणाऱ्या महिला चांगल्या आणि बुरखा न घालणाऱ्या महिला वाईट, अशा आशयाचे वक्तव्य एका महिलेने करताच किरण सोनवणे यांनी त्यांना रोखले आणि त्या चुकीची माहिती देत असल्याचे त्यांना समजावले.


Updated : 9 April 2022 2:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top