MSME Economy Package: चांगलं आहे, मात्र, कामगारांच्या वेतनाचं काय? : सुजित बांगर

Courtesy: Social Media

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेज च्या संदर्भात माहिती दिली. कोरोना व्हायरस च्य़ा संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधीत करताना मंगळवारी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती.

त्या पॅकेज अंतर्गत MSME सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांसाठी 3 लाख कोटी रुपये पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या पॅकेजमधून रोजगार करणाऱ्या लोकांना नक्की काय मिळालं? या संदर्भात माजी IRS, taxbudy.com चे संस्थापक सुजीत बांगर यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सरकारने केलेला हा चांगला प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे.

यामध्ये सर्वात महत्वाची घोषणा म्हणजे 3 लाख कोटी रुपयाची घोषणा करण्यात आली आहे. तसंच सरकार ने फंड्स ऑफ फंडस ची देखील निर्मिती केली आहे. त्यामुळं MSME मधील कंपन्यांना मोठी मदत होईल. एकंदरीत केंद्र सरकारने जाहीर केलेले पॅकेज चांगलं आहे. मात्र, याची अंमलबजावणी कशी होणार? या व्यवसायांमध्ये जे कामगार काम करतात? त्यांच्या वेतनाचं काय? या कामगारांचं वेतन सरकार ने जर दिलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं असं मत सुजित बांगर यांनी व्यक्त केलं आहे.