Home > मॅक्स व्हिडीओ > भारत जोडो यात्रेला समर्थन का ?

भारत जोडो यात्रेला समर्थन का ?

सामाजिक, लोकशाही, आणि सुरक्षेतेच्या दृष्टीने देश तुटत चाललेला आहे. हे सगळ वाचवायचं असेल तर आपला पक्ष सोडून भारत जोडो यात्रेत सहभागी होणे गरजेचे आहे. मी परदेशात असून देखील जोरदार भारत जोडो यात्रेच समर्थन करत आहे. यात्रेला कधीच विरोध करु नका.

भारत जोडो यात्रेला समर्थन का ?
X

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काहि सामाजिक संघटनेने संविधानावर विश्वास ठेऊन हि यात्रा निघाली. या यात्रेत सुप्रिम कोर्टाचे वकिल प्रशांत भूषण देखील सहभागी झाले. त्यांच्यावरती सुप्रिम कोर्टात मानहानीचा केसेस झाल्या आणि ते गाजल्या. जे लोक संविधानावर विश्वास ठेवतात त्याच्यांसाठी हि यात्रा एतिहासिक यात्रा आहे. नुकतेच बाबासाहेब आंबडकर यांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या. ज्या समाजाच्या दृष्टिने दडपशाही, विषमतेच्या विरोधात होत्या. असं नेहमीच वक्तव्य आर.एस.एस. आणि भाजप कडून केले जाते.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिज्ञावर देखील आक्षेप घेणे सध्या सुरू आहे. गुजरात आणि दिल्लीच्या निवडणूक झाल्यानंतर भाजप आणि आर.एस.एस. आंबेडकर यांच्या प्रतिज्ञावर बंदी घालण्याचे काम करेल.

कोणी कोणता ड्रेस घालावा, कोणी काय खाव. यावर ज्या काही मर्यादा लावले जात असल्याने मुळ संविधान बदलून विषमतेच्या आणि मनुस्मृतीच्या आधाऱ्यावर संविधान तयार करायच काम येणाऱ्या दिवसात आर.एस.एस. आणि भाजप यांच्याकडून केले जाईल.हा एक भाग झाला.

दुसरा भाग असा की समाजामध्ये हिंदू-मुस्लीम, हिंदू-ख्रिश्चन, सवर्ण-असवर्ण यांसारख्या भेदभाव वाढवलेले आहेत. असा भेदभाव वाढवणाऱ्या लोकांना स्वरक्षण दिलं जातं. हे लोक खासदार आणि मंत्री आहेत. सामाजात विष पेरणे - सामाजाला तोडणे हे काम एका बाजूला सुरू आहे. जिथे भाजप निवडूण येत नाही. तिथे भाजप इडी लावून, पैशाचे आमिष दाखवून विरोधकांना भाजप गोट्यात प्रवेश करायाला भाग पाडत आहे. आणि विरोधी पक्षाची सत्ता विकत घेण्याचे काम भाजप करत आहे.

भाजपकडून लोकशाही आणि संविधान दहशतवादीमुळे तुडत आहे. देशाचा दोन्ही यंत्रणा कुमकूवत झालेल्या असून, देशाच्या सीमा देखील सुरक्षित नाहीत. चीन देशाची आयात भारतात वाढली, परंतू चीनचे अँप बंद करुन चीनच्या विरोधात घोषणा देऊन आपल्याला अडकून ठेवण्याचे काम केल आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी तासान तास मंदिरात बसतात, ड्रेस बदलतात. दिवसेंदिवस वेळ देखील मंदिरात घालवतात. सामाजिक, लोकशाही, आणि सुरक्षेतेच्या दृष्टीने देश तुटत चाललेला आहे. हे सगळ वाचवायचं असेल तर आपला पक्ष सोडून भारत जोडो यात्रेत सहभागी होणे गरजेचे आहे. मी परदेशात असून देखील जोरदार भारत जोडो यात्रेच समर्थन करत आहे. यात्रेला कधीच विरोध करु नका. यात्रेला समर्थन देण्यासाठी का महत्त्वाचे आहे पाहुयात संग्राम पाटील यांचा व्हिडिओ.

Updated : 14 Nov 2022 3:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top