Home > मॅक्स व्हिडीओ > लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची पेरणी समाजात नव्यानं करण्याची गरज का?

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची पेरणी समाजात नव्यानं करण्याची गरज का?

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची पेरणी समाजात नव्यानं करण्याची गरज का?
X

पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नाही तर कष्टकरी, कामगार, शोषित, दलित आणि वंचितांच्या तळहातावर तरलेली आहे असं ठामपणे सांगणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती... या पार्श्वभूमीवर परिवर्तनवादी, पुरोगामी चळवळ धुसर होत असताना अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची समाजात पुन्हा एकदा पेरणी करणं गरजेचं आहे. त्यांची लेखणी जग बदलण्यासाठी, नवा समाज घडवण्यासाठीच्या दृष्टीकोनातून ओळखली जाते. श्रमजीवी, कामगार,शोषित, वंचित आणि दलितांनी झुंजार व्हा… लढा… संघर्ष करा... हीच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना खरी आदरांजली राहील... असं ज्येष्ठ विचारवंत संजय सोनवणी यांनी म्हटलं आहे. तसेच दीड दिवस शाळेत जाणाऱ्या महान व्यक्तिमत्वाचे साहित्यलेखन आणि विचार जगभर प्रसिद्ध कसे झाले? यासंदर्भात ज्येष्ठ विचारवंत संजय सोनावणी यांचा हा व्हिडिओ नक्की पाहा...

Updated : 1 Aug 2021 5:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top