डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शंकरराव खरात यांची पहिली भेट…

ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव खरात यांचं यंदा जन्मशताब्दी वर्ष. (11 जुलै 1921 ते 9 एप्रिल 2001) त्यानिमित्ताने मॅक्समहाराष्ट्र ज्येष्ठ साहित्यिक डॉ शंकरराव खरात यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी विशेष व्हिडीओंची सिरज करत आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील एक मुलगा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने वकील होतो. आणि वंचित समाजाला न्याय मिळवून देतो. गोरगरिबांच्या केस लढतो.

लोखंडी दिव्यावर अभ्यास करुन शंकरराव खरात यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्ररेणेने आटपाडी सारख्या गावात शिक्षण घेतले. त्यांची शिकण्याची जिद्द पाहून शिक्षकांनी त्यांना खूप मदत केली. पुढे त्यांनी पुढे ते फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण घेतले. परिस्थितीवर मात करत शंकरराव यांनी एल.एल.बी.चं शिक्षण पूर्ण केले.

शंकरराव खरात यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभला. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री असताना संसदेत भाषण देताना पाहिले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी दोन दिवस राहिले.

“मी स्वत: महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे’ असं ते नेहमी म्हणत. डॉ. बाबासाहेबांच्या सहवासात आल्यानंतर त्यांना अधिक गती मिळाली.

बॅंक ऑफ इंडियाचे संचालक, ऑफिसर्स सिलेक्‍शन कमिटीचे चेअरमन आणि मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू अशी अनेक सन्मानाची पदं तर त्यांनी भूषविलीच. तसंच त्यांनी इ. स. 1958 ते 1961 या काळात “प्रबुद्ध भारत” या नियतकालिकाचं संपादनही केलं. इ. स. 1984 साली जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.

साहित्य

बारा बलुतेदार, तडीपार, सांगावा, गाव-शीव इ. लिखाण. तराळ-अंतराळ हे आत्मचरित्र. आज इथं तर उद्या तिथं हा ललितलेखसंग्रह. टिटवीचा फेरा, सुटका, दौण्डी, आडगावचे पाणी इ. कथासंग्रह. हातभट्टी, गावचा टिनपोल गुरुजी, झोपडपट्टी, मसालेदार गेस्ट हाऊस, फूटपाथ नंबर 1, माझं नाव इ. कादंबऱ्या प्रकाशित आहेत.

दलित समाजाच्या अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या साहित्यिक शंकरराव खरात यांचं सामाजिक कार्य कसे वाढत गेलं… पाहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here