खरीप पिकांचा MSP किती टक्क्यांनी वाढवला… काय आहे सत्य?

Courtesy: Social Media

देशात अलिकडच्या काळात निर्माण झालेल्या संकटामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे. मोदी सरकार ने 20 लाख कोटीच्या पॅकेज मध्ये शेतकऱ्यांना विविध योजना देण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी सरकार 2 ला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर च्या पहिल्याच मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंत्रीमंडळाने 14 खरीप पिकांचं किमान समर्थन मूल्य (MSP) 50-80 टक्के वाढविणार असल्याची घोषणा केली आहे आणि काही वर्तमानापत्रांनी 50-80 टक्के हमीभावात वाढ असं लिहिलं आहे.

मात्र यातून चुकीचा निरोप जनतेत पोहचतोय. वास्तविकता ही आहे की गेल्या वर्षी जे हमीभाव होते. त्या हमीभावाच्या तुलनेत यावेळेस 3 टक्क्यांपासून ते 9-10 टक्क्यांपर्यंत भाव वाढ करण्यात आली आहे. मात्र, हा निर्णय शेतकऱ्यांसाठी पुरेसा आहे का? शेतकऱ्यांना अच्छे दिन येण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी नुसार शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव सरकार कधी देणार? तसेच देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्स झाल्यास खरचं शेतीमालाचे भाव दुप्पट होतील का ? असा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केला आहे. पाहा हा व्हिडिओ