Top
Home > मॅक्स व्हिडीओ > सायन हॉस्पिटल: मृतदेहा शेजारी रुग्णांवर उपचार काय आहे वस्तुस्थिती?

सायन हॉस्पिटल: मृतदेहा शेजारी रुग्णांवर उपचार काय आहे वस्तुस्थिती?

सायन हॉस्पिटल: मृतदेहा शेजारी रुग्णांवर उपचार काय आहे वस्तुस्थिती?
X

सोशल मीडियावर कोव्हीड 19 च्या मृत रुग्णांच्या जवळच रुग्णांवर उपचार करत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर विरोधी पक्षाने सरकार वर टीकेची झोड उठवली होती.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गलथान कारभार, दफ्तर दिरंगाई ला क्षमा केली जाणार नाही. असा सज्जड दम भरत सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी केली होती. या संदर्भात मेडिकल क्षेत्रात पत्रकारीता करत असलेले मयंक भागवत यांनी या प्रकरणात डॉक्टरांची बाजू जाणून घेण्यासाठी डॉ. अविनाश, साकनुरे, अध्यक्ष, मार्ड, सायन हॉस्पिटल आणि डॉ. विश्वदीप भालेराव, महासचिव, मार्ड, सायन हॉस्पिटल यांच्याशी बातचित केली. डॉ. अविनाश, साकनुरे यांनी सायन हॉस्पिटलमध्ये सध्या वर्कलोड वाढला असल्याचं सांगितलं. कारण हॉस्पिटलमध्ये कोव्हिड आणि नॉन-कोव्हिड रुग्ण येत असल्याने वर्कलोड वाढला आहे.

Courtesy: Social Media

मुंबईत कोव्हिड-१९ चे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आम्हाला दर २ दिवसांनी नवीन वॉर्ड तयार करावा लागतोय. पीपीई, मास्कची मागणी वाढल्याने पुरवठा कमी पडतोय. हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाला थोडा वेळ द्यावा लागेल. ही बाब देखील त्यांनी यावेळी मांडली.

हॉस्पिटल मध्ये मृतदेहाशेजारी झालेल्या उपचारा बाबत बोलताना डॉ. अविनाश सांगतात की "रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर व्हिडीओ काढणं चुकीचं आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीने मृतदेहाच्या बाजूला रुग्णांवर उपचार करणं देखील चुकीचे आहे. मात्र, रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर, शवाघरात नेईपर्यंत काही प्रोटोकॉल पाळावे लागतात. ते पूर्ण न करता बॉडी हलवू शकत नाही. रुग्णाचा किंवा मृत व्यक्तीचा अनादर करण्याची भावना नाही."

Courtesy: Social Media

डॉक्टरांना त्या वॉर्डमध्ये दाखल असलेल्या इतर सिरिअस रुग्णांकडेही लक्ष द्यायचं असतं. त्यामुळे मृतदेह सर्व प्रोटोकॉल पाळून रॅप करून ठेवण्यात आलेला असतो. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी येत नाहीत. त्यांना शोधावं लागतं. नातेवाईकांना शोधून त्यांना मृतदेह देण्यासाठी वेळ लागतो. यामध्ये प्रशासनही काही करू शकत नाही.

आपण मृतदेहाचा अनादर न व्हावा यासाठी त्या जमीनीवर न ठेवता. बेडवरच ठेवतो. ज्या पद्धतीने हा व्हिडीओ बाहेर आल्यानंतर लोकांपर्यंत पोहोचवण्यात आला हे दुखद होतं. आणि आमचं मॉरल (आत्मविश्वास) डाऊन करणारं होतं. जर अशा व्हिडीओचं वेगळ्या प्रकारे इंटरप्रिटेशन करण्यात आलं हे अत्यंत दुखद आहे. कारण आम्ही सर्व दिवसरात्र फक्त रुग्णांसाठी काम करतोय.

एकीकडे कोरोना वॉरिअर म्हणायचं आणि दुसरीकडे अशा घटनेनंतर डॉक्टरांना ब्लेम करायचं. त्यांच्यावर बोटं उटलायची. आम्ही आमचं काम करणं सोडणार नाही. पण दुख वाटतं की आपण लोकांसाठी काम करत असताना त्यांचा चुकीचा अर्थ घेतला जातोय. व्हिडीओची दुसरी बाजू कोणीच समजून घेत नाही. एका व्हिडीओवरून तुम्ही रुग्णालयाला असं बोलू शकत नाही.

Courtesy: Social Media

सायन रुग्णालयाच्या बाजूला धारावी आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी रुग्ण येतात. हाय-वे वरील मोठं ट्रॉमा सेंटर आहे सायन. फक्त कोरोना म्हणून नाही. याआधीही सायन मध्ये एका बेडवर दोन रुग्णांना ठेवलं जायचं. या आधाही रुग्ण ट्रान्सपोर्ट करायला वेळ लागायचा. या व्हिडीओमुळे हे फक्त कोरोनामुळे झालं असं दाखवण्यात आलं.

सायनमध्ये बेड्सची संख्या कमी आहे. येणाऱ्या रुग्णांना उपचार नाकारू शकत नाही. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ आणि सुविधांमध्ये आम्ही रुग्णांना उपचार देतोय. असं म्हणत डॉ. अविनाश साकनुरे यांनी आपली व्यथा मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना व्यक्त केली.

या संदर्भात आम्ही डॉ. विश्वदीप भालेराव, महासचिव, मार्ड, सायन हॉस्पिटल यांच्याशी देखील बातचित केली. त्यावेळी त्यांनी आमचे काही सहकारी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह निघाले. आम्हाला मनुष्यपळ कमी पडतंय. पण अशा परिस्थितीतही आम्ही २४ तास काम करतोय. यात डॉक्टरांची चूक काहीच नाही. मनुष्यबळ कमी आहे. १५० लोकं पॉझिटिव्ह आहेत. आम्हीच वेळ सांभाळून काम करतोय. बाहेरून मनुष्यबळ येत नाही. अशी परिस्थिती त्यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितली.

मात्र, या सर्वांमध्ये जेव्हा काही रुग्ण डॉक्टर तुमच्यामुळं जीव वाचला धन्यवाद. अशी पोस्ट लिहिलतात. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. सायन मोठं रुग्णालय आहे. सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी शेजारी आहे. मनुष्यबळ, स्टाफचा प्रश्न आधिपासूनच आहे. मुंबई महापालिकेकडून सायनला पहिल्यापासून दुजाभाव केला जातो. तो राजकारणाचा भाग आहे. आता प्रशासनाने पावलं उचलली पण काही गोष्टी कमी पडतात.

तो व्हिडीओ म्हणजे आमचं खच्चीकरणं केल्यासारखं आहे. यात डॉक्टरांची चूक काय? बाजूला रुग्ण सिरिअस झाला तर त्याच्यावर उपचार करायचे नाहीत का…?

बरं, मृतदेहाच्या बाजूला रुग्ण आहेत. पण डॉक्टर उपचार देत नाहीत असाही व्हिडीओ कोणी काढून टाकला असता. त्यामुळे उपचार करायचे का नाहीत..? असे दोन्ही प्रश्न निर्माण होतात.

असं म्हणत त्यांनी या व्हिडीओ मुळं डॉक्टरांचं मनोबल ढासळलं अशी व्यथा व्यक्त केली.

Updated : 22 May 2020 10:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top