भारतात टीव्हीचा चीप आणि वाह्याद वापर झाला – रत्ना पाठक

आपल्या देशात टीव्हीचा मूळ हेतूने वापर कधीच झाला नाही. याउलट टीव्हीचा चीप आणि वाह्याद वापर केला गेला, असं मत ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक यांनी व्यक्त केले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित ऑनलाईन संमेलनात त्या बोलत होत्या. अण्णाभाऊ साठेंसारख्या कलावंत आणि साहित्यिकांनी रंगमंचाची ताकद काय असते हे दाखवून दिले आहे. पण आजच्या काळात रंगमंच देशाला दिशा देण्याचे काम करु शकत नाहीये अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here