JNU Updates: देशभरातून हल्ल्याचा निषेध

दिल्लीच्या (JNU) जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या वस्तिगृहात रविवारी रात्री काही अज्ञात लोकांनी केलेल्या हल्ल्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या हल्ल्यामध्ये विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आइशी घोष यांना जास्त मार लागला असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. अज्ञातांनी माझ्यावर हल्ला केला. मला बेदम मारहाण झाली, असं ऐशी घोष ने व्हिडिओच्या माध्यमातून सांगताना दिसत आहे.

विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार 50 हून अधिक लोक तोंडाला रुमाल बांधून कॅम्पसमध्ये घुसले होते. त्यांनी JNU मधील गाड्यांची तोडफोड केली.

JNU मधील या हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटले. मुंबई, पुणे यासारख्या शहरात या हल्ल्याच्या विरोधात प्रदर्शन करण्यात आली आहेत. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे कॅंडल मार्च काढून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
तर पुण्यातील FTI मध्ये देखील या हल्ल्याच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी या हल्ल्याच्या विरोधात घोषणा दिल्या.

तर दुसरीकडे आज सकाळी मुंबईत या हल्ल्याच्या विरोधात गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांची निदर्शनं सुरु आहेत. या निदर्शनांमध्ये मुंबईमधील विविध कॉलेजची विद्यार्थी सहभागी झाली आहेत. अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे.

तर तिकडं दिल्लीमध्ये मनुष्य बळ विकास मंत्रालयाच्या सचिवांनी JNU च्या रजिस्टर, प्रॉक्टर आणि रेक्टर ला आपल्या कार्यालयात बोलावले आहे.

तर या हल्ल्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी संताप व्यक्त केला आहे. जेनएयूमध्ये झालेल्या हल्ला हा दहशतवादी हल्ला आहे आणि यामागे संघसमर्थक एबीव्हीपीचे गुंड असल्याचा आरोप अभिनेत्री स्वरा भास्कर हिने केलाय. पाहूया काल हल्ला झाल्यानंतर स्वराची नेमकी प्रतिक्रिया काय होती.