Home > News Update > मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात शिवसेनेचे बंड

मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात शिवसेनेचे बंड

मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात शिवसेनेचे बंड
X

मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात शिवसैनिकांनी भाजप विरोधात दंड थोपटले आहेत. युती असतानाही दक्षिण नागपूर मतदार संघात सेनेच्या उमेदवारानं बंडखोरी केलीय. अपक्ष म्हणून रिंगणात असलेल्या किशोर कुमेरिया या उमेदवारासाठी शिवसैनिक एकत्र आले आहेत. या उमेदवाराच्या प्रचारासाठी शहरातील सर्व शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात आला.

या मेळाव्यात सेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उघडपणे सेनेनं भाजपच्या विरोधात एकप्रकारे मोहीमच उघडलीय. दक्षिण नागपूर मतदार संघात सेनेचे शहराध्यक्ष किशोर कुमेरिया अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. मात्र, ते शिवसेनेचाचं उमेदवार म्हणून प्रचार करत आहेत. या मेळाव्यात सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या उमेदवाराला विरोध करत अपक्ष असलेले कुमेरिया यांना निवडणूक अणण्याचा संकल्प केला.

भाजपकडून सन्मान मिळत नाही आणि ज्या ज्या वेळी युती झाली त्या त्या वेळी भाजपनं युती धर्म पाळला नाही. त्यामुळं आम्ही यावेळी युती न पाळण्याचा निर्णय घेतल्याचं सेनेचे जिल्ह्याप्रमुख प्रकाश जाधव यांनी यावेळी जाहीर केलं.

https://youtu.be/6ixonifqBWc

Updated : 12 Oct 2019 9:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top