रावसाहेब दानवेंची मालमत्ता २० हजार कोटींची, जावयाचा आरोप

Courtesy : Social Media

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मालमत्ता २० हजार कोटी रुपयांची असल्याचा आरोप त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. त्याचबरोबर आपण आत्महत्या केली तर त्याला रावसाहेब दानवे जबाबदार असतील असा इशाराही दिला आहे.