Home > मॅक्स व्हिडीओ > Covid 19 वयोवृद्ध सरपटत चौथ्या मजल्यावरुन खाली आले, रुग्णवाहिका निघून गेली

Covid 19 वयोवृद्ध सरपटत चौथ्या मजल्यावरुन खाली आले, रुग्णवाहिका निघून गेली

Covid 19 वयोवृद्ध सरपटत चौथ्या मजल्यावरुन खाली आले, रुग्णवाहिका निघून गेली
X

कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्णाला रुग्णवाहिका नसल्याने रुग्णालयात चालत येण्याचा सल्ला दिल्याची घटना ताजी असताना आज सायंकाळी कल्याण पर्वमधील कोरोना संशयीत वृद्ध चौथ्या मजल्यावरुन सरपटत खाली आले असताना त्यांना घेण्यासाठी आलेली रुग्णवाहिका आली आणि परत निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल आहे. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाला असून ही घटना पाहून माणुसकी मनात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं मन हेलावून जाईल. यावरुन कल्याण डोंबिवली महापालिकेचा कोरोना रुग्णाची किती काळजी आहे ही बाब देखील आता उघड समोर आहे.

कल्याण पूर्वमधील हनुमाननगर भागात दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ते एका चार मजली इमारतीत राहतात. त्यांना कोरोना झाल्याने त्यांच्या घरातील त्यांचे 71 वर्षीय वडील व आई हे दोघे कोरोना संशयित रुग्ण आहेत. त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मुलांनी फोन केला. या दोन्ही वृद्धाना घेण्यासाठी रुग्णवाहिका सोसायटीच्या दारात आली.

दरम्यान या दोन्ही वयोवृद्धांना चालण्याचा त्रास असल्याने ते दोघेही चौथ्या मजल्यावरुन सरपटत खाली आहे. ते खाली आल्यावर त्यांना घेण्यासाठी आलेली रुग्णवाहिका निघून गेली होती. रुग्णवाहिकेच्या चालकाने थांबण्यास नकार दिला. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. घटनेचे कथन त्यांच्या मुलांनी व्हीडीओत केले आहे. महापालिकेकडे 33 रुग्णवाहिका आहे.

त्यापैकी काही रुग्णवाहिका महापालिकेच्या आहे. बहुतांशी रुग्णवाहिका या भाडे तत्वावर घेण्यात आल्या आहेत. रुग्णवाहिका चालकांना तीन शिफ्टमध्ये काम करावे लागते. त्यांच्या चाचण्या करण्यात आलेल्या नाहीत. त्यांना सोयी सुविधा दिलेल्या नाही. खाजगी रुग्णवाहिकांवर महापालिकेचे नियंत्रण नाही. त्याचाच फटका या वयोवृद्धांना बसला आहे.

यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, त्या दोन कोरोना संशयित वृद्धांना घेण्यासाठी रुग्णवाहिका गेली होती. मात्र, रुग्णवाहिका चालकाचा उपवास होता. उपवास सोडण्याची वेळ सायंकाळी सात वाजता होती. त्यामुळे रुग्णवाहिका चालक उपास सोडण्यास गेला. त्यामुळे वृद्धांची गैरसोय झालेली आहे हे मान्य केले.

Updated : 24 May 2020 2:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top