Home > मॅक्स व्हिडीओ > जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षकांची गांधीगिरी

जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षकांची गांधीगिरी

जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षकांची गांधीगिरी
X

शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने मोर्चा चे आयोजन करण्यात आले.या मोर्चामध्ये महिला शिक्षकांसह मुख्याध्यापक सहभागी झाले होते.

शिक्षकांचे अंशदायी पेन्शन योजना रद्द करण्यात यावी, याबरोबरच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, यासाठी शिक्षकांनी गांधीगिरी पध्दतीने बीड येथे आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते.

यावेळी शिक्षकांनी घोषणा देत मागण्यांचे फलक झळकावले. शिक्षकांची अंशदायी पेंन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेंन्शन योजना लागू करावी. निकषपात्र विनाअनुदान शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सुत्रा नुसार 100% अनुदान देवून या शाळांवर कार्यरत शिक्षकांची वेठबिगारी थांबवावी. राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना 10,20,30 या तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करावी.

तासिका तत्वावर काम करत असलेल्या प्राध्यापकांना नियमित प्राध्यापक म्हणून मान्यता देण्यात याव्यात. शिक्षक पाल्यांना पूर्वी प्रमाणेच मोफत शिक्षण देण्यात यावे. सर्व शैक्षणिक संस्थांना सातव्या वेतन आयोगप्रमाणे वेतनेत्तर अनुदान द्यावे. या व इतर मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने मराठवाडाभर मोर्चे काढण्यात आले. याची सुरुवात नांदेड पासून झाली .त्यानंतर उस्मानाबाद, लातूर आणि जालना मोर्चे काढण्यात आले होते. यांनंतर बीड येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बीड येथील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स येथून या मोर्चाला सुरुवात झाली .हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला.


Updated : 28 Oct 2022 11:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top