Home > मॅक्स व्हिडीओ > वंचितांचे प्रश्न मांडण्यासाठी आजही गाणीच का प्रभावी ठरतात?

वंचितांचे प्रश्न मांडण्यासाठी आजही गाणीच का प्रभावी ठरतात?

वंचितांचे प्रश्न मांडण्यासाठी आजही गाणीच का प्रभावी ठरतात?
X

देशाला लोकचळवळींचा मोठा इतिहास आहे. या चळवळी जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांची व्याप्ती वाढवण्यात प्रेरणादायी गाण्यांचे योगदान मोठे आहे. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनातही रात्री आंदोलक शेतकरी गाणी गाऊन दिवसभराची ऊर्जा मिळवत असल्याचे चित्र आहे. आजही वंचित समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी गाण्यांचा प्रभावी उपयोग होतो आहे.

आजची तरुण पिढीही यामध्ये मोठे योगदान देते आहे. शरद टिके यांनी लिहिलेले आणि गायलेले "आलंय आदिवासी वादळ आमचं आलंय आदिवासी वादळ" हे गाणं सध्या सोशल मीडियावर गाजते आहे. युट्यूबवर या गाण्याला तब्बल १६ लाखांच्यावर व्ह्यूज मिळाले आहेत. आदिवासी बांधवांचा संघर्ष आणि त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी लिहिल्या गेलेल्या या गाण्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

आजही आपले प्रश्न, समस्या आणि भावना मांडण्यासाठी वंचित घटकांना गाण्यांचाच आधार आहे. याच विषयावर या सुपरहीट गाण्याचे गायक शरद टीपे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे पालघरचे प्रतिनिधी रवींद्र साळवे यांनी....

Updated : 6 Feb 2021 9:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top