शिवाजी विद्यापीठाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावे का?
X
सध्या शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला घेऊन चर्चा सुरू आहे. शिवाजी विद्यापीठाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ व्हावे, अशी मागणी यापूर्वी अनेक संघटनांनी केली आहे. हीच मागणी राज्यभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा लावून धरली आहे.
हे ही वाचा
गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट
गांधीजी आम्हाला माफ करा – हेमंत देसाई
अमित शहांवर निर्बंध घालण्याची मागणी
याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवत तात्काळ विद्यापीठाच्या नामविस्ताराची शिफारस राज्यपाल यांच्याकडे केली आहे. खरं तर, १९६२ सालीच विद्यापीठाची स्थापना करत असताना, शिवाजी विद्यापीठाचे नाव, शिवाजी विद्यापीठ न ठेवता छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ ठेवावं, अशी मागणी पुढं आली होती.
त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी समिती नेमून या वादावर पडदा टाकला होता. त्यावेळी तावडे समितीनं दिलेल्या अहवालात विद्यापीठाचे नाव शिवाजी विद्यापीठ असलं पाहिजे, असं नमूद केलं होतं.
याला ५७ वर्षे पूर्ण झाली असताना खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आता लावून धरली आहे. ही मागणी योग्य नसल्याचे ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांनी म्हटलंय.
इतकंच नाहीतर खासदार संभाजीराजे यांच्या मागणीचा आदर करतो, पण शिवाजी विद्यापिठाचे नाव शॉर्टकट, होईल, आणि त्यातून शिवाजी महाराजांचे नाव कालबाह्य होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.
यापूर्वीच, शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलण्याचा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता नव्यानं हा वाद निर्माण करण्याचे काही कारण नाही. आता हा वाद निरर्थक असल्याचं मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केलं आहे.