शिवसेनेचे सोशल मीडियावर पेड ट्रोलर- देवेंद्र फडणवीस

Courtesy: Social Media

सोशल मीडियाचा वापर शिवसेनेतर्फे खोटे चित्र रंगवण्यासाठी केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एवढेच नाही तर शिवसेनेने सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार करुन पेड ट्रोलर नेमले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी हा आरोप केला आहे.