ऋषिकपूर आज संध्याकाळी झोपडपट्टीत या…..

लॉक डाऊनच्या काळात दारूची दुकाने संध्याकाळी उघडी ठेवा अशी मागणी अभिनेता ऋषी कपूर यांनी केली. एकेकाळी गरिबांचा प्रतिनिधी म्हणून काम केलेल्या राज कपूर यांच्या परिवारातील व्यक्तीने गरिबांच्या कुटुंबांचा विचार न करता केलेली ही असंवेदनशील मागणी धक्कादायक आहे.

श्रीमंतांसाठी दारू हा व्यक्ती स्वातंत्र्याचा विषय असेलही परंतु आज लॉकडाऊनच्या काळात गरीब कुटुंबाला रोजगार नाहीये, त्यामुळे आहे तेच धान्य, पैसे जपून वापरावे लागतील. अशावेळी दारू उपलब्ध झाली तर पुरुष ते पैसे उधळून टाकतील आणि गरीब कुटुंबात उपासमार होईल इतकेही ऋषी कपूर यांना समजत नसेल का?

आपला उच्चभ्रू वर्ग इतका असंवेदनशील कसा? ‘भाकरी नाही तर ब्रेड खा’ याप्रमाणे ऋषी कपूर यांनी बोलणे हे चीड आणणारे आणि धक्कादायक असेच आहे. ऋषी कपूर यांच्या या भूमिकेबाबत मॅक्स महाराष्ट्रच्या कॉमन मॅन या स्तंभातून विश्लेषण केले आहे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी….