Home > मॅक्स रिपोर्ट > Priyanka Gandhi : काँग्रेसच नेतृत्व प्रियंका गांधी यांच्या हाती?

Priyanka Gandhi : काँग्रेसच नेतृत्व प्रियंका गांधी यांच्या हाती?

प्रियंका गांधी काँग्रेसमध्ये महत्वाच्या रोलमध्ये येण्याची चर्चा जोरदारपणे सुरु आहे. प्रियंका गांधी यांनी आधी उत्तरप्रदेश, त्यानंतर हिमाचल प्रदेश आणि आता कर्नाटक आणि तेलंगणात सभांचा धडाका लावलाय. त्यामुळे काँग्रेसचं नेतृत्व प्रियंका गांधी यांच्या हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण काय आहेत शक्यता? जाणून घेण्यासाठी पहा भरत मोहळकर यांचा स्पेशल रिपोर्ट

X

कधी प्रियंका जंतर मंतरवर बसलेल्या कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी जातात तर कधी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी... त्यामुळे प्रियंका गांधी काँग्रेसचं नेतृत्व करावं, अशी मागणी अनेकदा प्रियंका गांधी समर्थकांकडून केली जात आहे. त्यातच सोनिया गांधी यांनीही राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे प्रियंका गांधी यांनी काँग्रेसचं नेतृत्व करण्याची गळ घातली जातीय.

काँग्रेसच्या रायपूर अधिवेशनात सोनिया गांधी यांनी निवृत्तीचे संकेत दिलेत. त्यातच दुसरीकडे राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना सहा वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. त्यापार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांच्या हाती काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा येण्याची शक्यता वाढली आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने प्रियंका गांधी वायनाडमधून लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगलीय. दुसरीकडे सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातूनही प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढवण्याची मागणी केली जात आहे.

प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत मैं लडकी हूँ, लढ सकती हूँ चा नारा देत उत्तर प्रदेश पिंजून काढला. मात्र उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात सत्ता आणण्यात अपयश आलं. मात्र हिमाचल प्रदेशात प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रचार करत भाजपची सत्ता उलथून टाकली. आता प्रियंका गांधी कर्नाटकमध्ये आक्रमकपणे सभा घेत आहेत. त्यामुळे हिमाचल प्रदेश नंतर कर्नाटकमध्ये प्रियंका गांधी पक्षाला सत्ता मिळवून देणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण प्रियंका गांधी यांच्यात आम्हाला इंदिरा गांधी दिसत असल्याचं तेलंगणातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटलंय.

प्रियंका गांधी सध्या काँग्रेसच्या महासचिव आहेत. त्यांच्या खांद्यावर 2019 मध्ये महासचिव पदाची जबाबदारी दिली आहे. त्यातच आता राहुल गांधी यांची गेलेली खासदारकी आणि सोनिया गांधी यांनी दिलेले निवृत्तीचे संकेत प्रियंका गांधी यांच्यासाठी मोठी संधी आहे, अशी चर्चा काँग्रेसमध्ये रंगलीय.

मात्र प्रियंका गांधी या काँग्रेसचं नेतृत्व करू शकतात का? याविषयी आम्ही ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्याशी बातचित केली. यावेळी हेमंत देसाई म्हणाले की, प्रियंका गांधी अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यांना 2019 मध्ये काँग्रेसचं महासचिव करण्यात आलं. गेल्या वर्षी त्यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश निवडणूक लढवली. पण तिथे अपयश आलं. पण त्यापुर्वी प्रियंका गांधी या फक्त अमेठी आणि रायबरेली या ठिकाणीच प्रचार करत होत्या. मात्र उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांना अपयश आलं असलं तरी प्रियंका गांधी यांनी हिमाचल प्रदेश निवडणूक जिंकली. याचा अर्थ ज्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते जीव ओतून काम करत आहेत. तिथे प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात विजय मिळाला आहे. एवढंच नाही तर प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यात कुठल्याही प्रकारे भांडण नाही. मात्र भाजप त्यांच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सध्यातरी प्रियंका गांधी काँग्रेसचं नेतृत्व करतील, असं वाटत नाही.

त्यामुळे सोनिया गांधी यांची निवृत्ती, राहुल गांधी यांची गेलेली खासदारकी अशा संकटात प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसला 2024 मध्ये यश मिळाल्यास प्रियंका गांधी दुसरी इंदिरा अम्मा ठरण्याची शक्यता आहे.

Updated : 14 May 2023 2:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top