Top
Home > Max Political > नरेंद्र मोदी यांच्या लडाख दौऱ्यातून काय साध्य होणार ?

नरेंद्र मोदी यांच्या लडाख दौऱ्यातून काय साध्य होणार ?

नरेंद्र मोदी यांच्या लडाख दौऱ्यातून काय साध्य होणार ?
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 जुलै ला भारत चीनच्या सीमेवर असलेल्या लेह ला भेट दिली. सध्या भारत आणि चीन दरम्यान गलवान खोऱ्यात तणाव सुरु आहे. या तणावादरम्यान 15 जूनला दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये झालेल्या बाचाबाचीत 20 सैनिक शहिद झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक केलेला लेह दौऱ्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठं महत्त्व प्राप्त होतं.

त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लेहचा दौरा अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. या संदर्भात परराष्ट्र धोरण विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना या दौऱ्यामुळं नक्की भारताच्या परराष्ट्र धोरणावर काय परिणाम झाला? या दौऱ्यामुळं चीन वर नक्की काय परिणाम होईल? यासह मोदींच्या या दौऱ्यानं भारत-चीन सीमेवरील संघर्ष आणखी टोकाला जाईल का?

भारत-चीन यांच्यातील संघर्ष स्थानिक पातळीवर व्हायचे परंतु मोदींच्या भेटीमुळे आता हा संघर्ष आता दोन देशांमध्ये सुरु झाल्याचं स्पष्ट झालं आहे का?. भारत चीनच्या कुरघोड्यांना आता भारत गंभीरपणे उत्तर देत आहे का? एकंदरित मोदींच्या या दौऱ्यातून चीन सह मोदींनी पाकिस्तानला देखील इशारा दिला आहे का? पाहा आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद देवळाणकर यांचा हा व्हिडिओ.

Updated : 4 July 2020 5:58 PM GMT
Next Story
Share it
Top