Home > News Update > पी.एम.सी. बॅंक निर्बंध : धनत्रयोदशी दिवशी घरची लक्ष्मी पैशासाठी वणवण फिरते

पी.एम.सी. बॅंक निर्बंध : धनत्रयोदशी दिवशी घरची लक्ष्मी पैशासाठी वणवण फिरते

पी.एम.सी. बॅंक निर्बंध : धनत्रयोदशी दिवशी घरची लक्ष्मी पैशासाठी वणवण फिरते
X

पी.एम.सी. बँक बंद झाल्यानंतर, बँक खातेदारांना पैसे काढण्यासाठी आर.बी.आय. ने फक्त सहा महिन्यांमध्ये चाळीस हजार रक्कम बँकेच्या खातेतून काढण्याची परवानगी दिली आहे.

दिवाळीच्या सणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी बँक खातेदारांना त्यांचे हक्काचे पैसे त्यांना मिळत नाहीत, त्यांचे हक्काचे पैसे त्यांना मिळावेत म्हणून काही महिलांनी लाल कपडे घालून मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्या बाहेर शांततेच्या स्वरूपात आंदोलन केले होते.

आंदोलन करणाऱ्या महिलांना आझाद मैदान पोलिसांनी अटक करून त्यांना लगेच सोडून दिलं. आर.बी.आय. ने या बँक खातेदारांचे पैसे सुरक्षित आहेत का? याची माहिती देखील या बँक खातेदारांना दिलेली नाही. तसंच त्यांचे पैसे त्यांना कधी मिळतील? या स्वरूपातील माहिती देखील आर.बी.आय. ने बँक खातेदारांना दिलेली नाही.

गेल्या एक महिन्यापासून त्यांच्या हक्काच्या पैशासाठी हे बँक खातेदार आंदोलन करत आहेत. या आंदोलनामध्ये आतापर्यंत सहा लोकांना जीव देखील गमवावा लागला. या पुढे देखील आम्ही आंदोलन करत राहू अशी प्रतिक्रीया या महिलांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना दिली.

धनत्रयोदशी दिवशी ही घरची लक्ष्मी पैशासाठी वणवण फिरते अशी खंत महिलांनी व्यक्त केली ...पाहा हा व्हिडिओ

Updated : 26 Oct 2019 9:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top