करोना दिवाळी!

करोना दिवाळी!
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या विरोधातील लढाईमध्ये देशातील नागरिकांना ५ एप्रिलला ९ वाजून ९ मिनिटांनी दिवे लावण्याचं, मेणबत्ती लावण्याचं, टॉर्च लावण्याचं आवाहन केलं होतं. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देताना काही नेटिझन्स रस्त्यावर उतरत लॉकडाऊन चा भंग केला आहे.

मोदींनी केलेल्या आवाहन लोकांनी कायदा मोडून पूर्ण केलं. एकीकडे मोदींचं आवाहन आणि दुसरीकडं या सर्व बाबींच्या पलिकडे जाऊन जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येते की, कोरोना विरोधाच लढण्यासाठी आपल्या डॉक्टरांकडे पुरसे साधनं नाही.

देशातील लोक मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरस ने त्रस्त असताना या लोकांना दिलासा देण्याचं काम सरकारचं आहे. विशेष बाब म्हणजे याबाबत मोदी काहीही बोलताना दिसत नाही. टाळया आणि थाळ्यामध्ये लोकांना गुंतवून ठेवण्याचं काम मोदी करत आहेत. असा आक्षेप लोकांनी घेतला आहे. या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार आणि मॅक्समहाराष्ट्रचे संपादकीय सल्लागार निखिल वागळे यांना जनतेने अनेक प्रश्न विचारले आहेत. या सर्व प्रश्नांना निखिल वागळे यांनी रोखठोक भूमिका घेत जनतेच्या प्रश्नांना दिलेली उत्तर नक्की पाहा…

Updated : 6 April 2020 1:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top