तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ नागपूरकर रस्त्यावर

नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरुन बदली झाल्यानंतर तुकाराम मुंढे मुंबईला रवाना झाले. पण यावेळी नागपूरकरांनी अनोख्या पद्धतीने मुंढेंचे समर्थन करत त्यांना निरोप दिला.

1,428

नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरुन बदली झाल्यानंतर तुकाराम मुंढे शुक्रवारी नागपूरहून मुंबईसाठी रवाना झाले. पण यावेळी हजारो नागपूरकरांनी तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. तसंच तुकाराम मुंढे यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. सकाळपासून नागरिकांनी तुकाराम मुंढे यांच्या घराबाहेर लोकांनी गर्दी केल होती. सात महिन्याच्या आतच तुकाराम मुंढेंची नागपुरातून बदली करण्यात आली आहे. नागपूर महापालिकेतील सत्ताधारी भाजपशी संघर्ष झाल्याने मुंढे यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.

तुकाराम मुंढे यांचे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थन केले होते. तसेच ते चांगले काम करत आहेत असेही म्हटले होते. पण त्यानंतर काही दिवसातच तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली. तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीमुळे सत्ताधाऱ्यांना कायमच त्रास होत असल्याने त्यांची वारंवार बदली केली जाते. पण प्रत्येक ठिकाणी तुकाराम मुंढे यांना जनतेचा पाठिंबा मिळतोय. त्यांच्या समर्थनार्थ अनेक शहरांमध्ये नागरिकांनी आंदोलनंही केली आहेत.

Comments