उद्धव सरकारचा विजय आणि भाजपचा रडीचा डाव

178

राज्यात सत्तास्थपनेची नवी समीकरण जुळत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे भिन्न विचारधारेच्या पक्षांनी आज विधानसभेत एकत्र बहुमत सिद्ध करुन सरकार स्थापन केलं. दुसरीकडे या विरोधात भाजपने मतदान होण्यापुर्वी सभागृहात काही आक्षेप नोंदवले. मात्र, या आक्षेपांना हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी फेटाळुन लावलं. यानंतर आपल्या मित्रपक्षांसह भाजप पक्षाने सभात्याग केला.

आपण बहुमत सिद्ध करु शकत नाही म्हणुन भाजपने सभागृहातुन पळ काढला का? एकीकडे उद्धव सरकारचा विजय होत असताना दुसरीकडे भाजपने रडीचा डाव खेळला का? या विषयी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं रोखठोक विश्लेषण जाणुन घेण्यासाठी पाहा व्हिडीओ…