Home > मॅक्स व्हिडीओ > पंतप्रधानांवर टीका केल्याने केजरीवाल, प्रियांका यांना नोटीस...

पंतप्रधानांवर टीका केल्याने केजरीवाल, प्रियांका यांना नोटीस...

पंतप्रधानांवर टीका केल्याने केजरीवाल, प्रियांका यांना नोटीस...
X

सध्या ५ राज्यात निवडणूकांच शंक फूंकण्यात आलं आहे. यावरू या राज्यात सर्व पक्षांकडून जाहिर सभांचे आयोजन केलं जातंय. यासभेतून सर्वच पक्षातून टीका टीप्पणी सुरू आहे. याचं टीका टिप्पणीमुळे राजकारण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याबद्दल निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वड्रा यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आली आहे

दिल्लीत भाजपने केलेल्या तक्रारीची निवडणूक आयोगाने अतिशय तातडीने दखल घेतली आहे. या दोन्ही नेत्यांना गुरुवारी (१६ नोव्हेंबर) संध्याकाळी ७ वाजेपर्यंत उत्तरे दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. 'निर्धारित वेळेत तुमच्या बाजूने कोणताही प्रतिसाद न आल्यास या प्रकरणात तुमचे म्हणणे काही नाही असे गृहीत धरले जाईल आणि निवडणूक आयोग याप्रकरणी योग्य ती कारवाई करेल किंवा निर्णय घेईल', असा इशाराही रविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वड्रा यांना देण्यात आला आहे.

"प्रियांका गांधी यांनी अलीकडेच मध्यप्रदेशातील निवडणूक सभेत पंतप्रधान मोदींबद्दल खोटी विधाने केली होती', या भाजपच्या तक्रारीवर आयोगाने त्यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले नरेंद्र मोदी सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे (पीएसयू) सर्रस खासगीकरण केल्याचा निराधार आणि खोटा दावा प्रियांका यांनी केल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

'आप' ला तर सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओवरून नोटीस बजावण्यात आली आहे. 'आप' चे मोदींच्या विरोधातील हे व्हिडीओ व भाषणे अत्यंत अस्वीकारार्ह आणि अनैतिक असल्याचे सांगून भाजपने आयोगाकडे धाव घेतली होती. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, पक्षाचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख अनिल बलूनी आणि पक्षनेते ओम पाठक यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने या मुद्दयावर निवडणूक आयोगाचे दार ठोठावले होते. लोकशाही पद्धतीने निवडून आलेला नेता, जो पंतप्रधानही आहे, तो कोणाचा तरी पगारदार कर्मचारी आहे ही 'आप'ची टीका अत्यंत पातळीहीन असल्याचे पुरी म्हणाले.


राहुल गांधीही रडारवर ?

'आप'ने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी केजरीवाल यांच्यावर कारवाई का करू नये, अशी विचारणा निवडणूक आयोगाने नोटिशीत केली आहे. मात्र, 'आप'च्या व्हिडीओमध्ये जी टीका केलेली आहे, थेट तशीच टीका काँग्रेस नेते राहुल गांधी हेही अलीकडे वारंवार करीत आहेत. ते उद्योगपती गौतम अदानी यांचा थेट नामोल्लेखही करत असतात. त्यामुळे आयोगाच्या व्याख्येनुसार आचारसंहिताभंगाबद्दल तेही नोटिशीच्या रडारवर लवकरच येऊ शकता आहे

Updated : 17 Nov 2023 4:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top