Home > मॅक्स व्हिडीओ > गणेश नाईक यांच्या अटकेसाठी राष्ट्रवादी आक्रमक

गणेश नाईक यांच्या अटकेसाठी राष्ट्रवादी आक्रमक

गणेश नाईक यांच्या अटकेसाठी राष्ट्रवादी आक्रमक
X

नवी मुंबईत भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अटकेच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप आमदार गमेश नाईक यांना तातडीने अटक करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उपायुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. गणेश नाईक यांच्याविरोधात एका महिलेने शारीरिक व मानसिक शोषण तसेच धमकावल्या प्रकरणी तक्रार केली आहे. या तक्रारीवरून नबी मुंबई पोलिसांनी गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला पण गुन्हा दाखल होऊन 3 दिवस उलटले तरी अद्याप गणेश नाईक यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पोलिस उपायुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले, तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Updated : 19 April 2022 7:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top