नांदेडमध्ये चिकन दुकानांना मोठी आग
टीम मॅक्स महाराष्ट्र | 13 May 2022 2:26 PM GMT
X
X
नांदेड शहरातील तरोडा भागातील चिकन सेंटरच्या दुकानांना अचानक लागलेल्या आगीत शेकडो कोंबड्या जाळून खाक झाल्या आहेत. गेल्या काही दिवसात तरोडा नाका परिसरात आग लागण्याच्या अनेक घटना घडत असून आज लागलेल्या आगीत सलग सहा दुकानांनी पेट घेतला आहे .
आगीचा भडका इतका मोठा होता की, या आगीतून काळेकुट्ट धुराचे लोट दिसून आले. या घटनेमुळे आजूबाजूच्या वसाहतीत मार्केटमध्ये खळबळ माजली असून या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दल त्वरित दाखल झाल्याने मोठी हानी टळली आहे. याच भागातील गादी बनविणाऱ्या दुकानाला अचानकपणे आग लागली आणि ही आग आजूबाजूच्या चिकन मटण दुकानात पसरली , यामुळे शेकडो कोंबड्या आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे. फायरब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा फवारा सुरू केल्यानंतर आग विझली आणि त्यांनतर सहा दुकाने जळून राखरांगोळी झाल्याचे चित्र दिसत होते.
Updated : 2022-05-13T19:57:44+05:30
Tags: Nanded fire chiken shops
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire