Home > मॅक्स व्हिडीओ > मोदी सरकारचं लॉकडाऊनचं नियोजन चुकलं: कुमार केतकर

मोदी सरकारचं लॉकडाऊनचं नियोजन चुकलं: कुमार केतकर

मोदी सरकारचं लॉकडाऊनचं नियोजन चुकलं: कुमार केतकर
X

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक परिणाम आशिया खंडातील देशावर होणार असं मत आंतरराष्ट्रीय नाणे निधीने व्यक्त केलं आहे. (IMF) आशिया खंडातील देशाचा विचार केला तर चीन बऱ्यापैकी या संकटातून पुढे निघून गेला आहे. तर जपान हे प्रगत राष्ट्र आहे. आणि भारत एक विकसनशिल देश आहे. त्यामुळं कोरोनाच्या आर्थिक फटक्याचा सर्वाधिक परिणाम अत्यंत उपेक्षित आणि मध्यम वर्गावर होण्याची शक्यता आहे.

या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर यांनी विस्तृत विश्लेषण केलं आहे. त्यांच्या मते संघटीत, असंघटीत, कुशल, अकुशल कामकारांना येत्या काळात मोठ्या प्रमाणात उपासमारीला तोंड द्यावं लागेल. कोरोना नं जेवढी माणसं मरतील त्यापेक्षा जास्त माणसं, कुपोषणाने किंवा उपोषणाने मरण्याची शक्यता आहे. असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं आहे.

कोरोना: भारत आणि जग

अर्थव्यवस्था: काल, आज आणि उद्या – कुमार केतकर

कोरोना व्हायरस चा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीयांना – कुमार केतकर

तसंच देशातील लॉकडाऊन हे नियोजन न करता जाहीर केलेलं लॉकडाऊन आहे. नियोजन न करता केलेल्या लॉकडाऊन मुळं लोक रस्त्यावर उतरत आहेत. माध्यमं देशातील वस्तुस्थिती दाखवत नाहीत. त्यामुळं खरी वस्तुस्थिती समोर येत नाही. मात्र, ती हळूहळू समोर येईल. असं मत व्यक्त करत या परिस्थिती सरकारने काय करायला हवं या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केलेलं विश्लेषण नक्की पाहा..

Updated : 19 April 2020 11:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top