‘लाव, रे तो व्हिडीओचा’ खर्च मनसेला सादर करावाच लागेल – निवडणूक आयोग
Max Maharashtra | 3 May 2019 6:50 PM IST
X
X
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूकीच्या चारही टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात सभा घेतल्या. या सभांबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने राज ठाकरेंच्या त्या सभांचा खर्च हा मनसे पक्षाच्या खर्चात गृहीत धरला जाईल, असं स्पष्ट केलंय. शिवाय या खर्चाचा तपशीलही मनसेला आयोगाला सादर करावा लागणार आहे, अशी माहिती अतिरिक्त निवडणूक आयुक्त दिलीप शिंदेंनी दिलीय.
राज ठाकरे यांच्या सभांच्या खर्चावर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
- सभांचा खर्च मनसेच्या खर्चात धरला जाईल – निवडणूक आयोग
- सभेबाबत तक्रारी आल्यानेच नोटीस पाठवली – दिलीप शिंदे, राज्य अतिरिक्त निवडणूक आय़ुक्त
- राज ठाकरे यांना सभांच्या खर्चाचा हिशोब द्यावा लागणार
- मनसेच्या सभांबाबत तक्रारी आल्यानंतरच नोटीस बजावली – निवडणूक आयोग
Updated : 3 May 2019 6:50 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire