Home > मॅक्स व्हिडीओ > परराज्यातून परतलेल्या मजुरांचे हाल, जेवण, पाण्याचीही सोय नाही

परराज्यातून परतलेल्या मजुरांचे हाल, जेवण, पाण्याचीही सोय नाही

परराज्यातून परतलेल्या मजुरांचे हाल, जेवण, पाण्याचीही सोय नाही
X

गडचिरोली जिल्ह्रयात इतर राज्यांमधून आलेल्या मजुरांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. पण त्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीयेत, अशी तक्रार या मजुरांनी केली आहे. तेलंगणामधून आलेल्या मजूरांना गडचिरोलीपासून 12 किमी अंतरावरील येवली या ठिकाणी शाळेत ठेवण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आणि श्री साईनाथ विद्यालय या दोन शाळांमध्ये अंदाजे 120 मजूर होते. पण अनेक मजुरा़ंना त्यांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच सोडून दिल्याचा आरोप इतर मजुरा़ंनी केला आहे. 3 मे रोजी आलेल्या मजुरांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच 15 मे रोजी सोडण्यात आले. तसंच 6,8 आणि 10 तारखेला आलेल्या मजुरांना 17 तारखेला सोडण्यात आले असे या मजुरांचे म्हणणे आहे.

त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सोय नाहीये, कोणताही अधिकारी सरकारी आदेश असताना सुद्धा गावात हजर राहत नाही. दररोजची तपासणी देखील होत नाही, पिण्याच्या पाण्याची, अंघोळीची सोय नाही. तसेच जेवणाची सोयदेखील नाहीये अशी तक्रार या मजुरांनी केली आहे.

Updated : 22 May 2020 1:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top