Home > मॅक्स व्हिडीओ > हे उशीरा सुचलेले शहाणपण, राज्यपालांच्या भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्रानंतर महाविकास आघाडीची टीका

हे उशीरा सुचलेले शहाणपण, राज्यपालांच्या भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्रानंतर महाविकास आघाडीची टीका

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त करण्याची मागणी केली. त्यानतंर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांच्या पत्रावर प्रतिक्रीया दिल्या आहेत. त्याचाच वेध घेणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचा स्पेशल रिपोर्ट...

हे उशीरा सुचलेले शहाणपण, राज्यपालांच्या भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्रानंतर महाविकास आघाडीची टीका
X

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh koshyari) यांनी महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना हटवण्याची मागणी राज्यभरातून होत होती. त्यातच महाविकास आघाडीनेही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्यासाठी मोर्चा उघडला होता. एवढंच नाही तर महापुरुषांचे अवमान प्रकरण नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनातही गाजले. यावेळी विरोधी पक्षाने सरकारला घेरण्यचा जोरदार प्रयत्न केला होता.

महाविकास आघाडीचे नेते आणि जनतेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर आता भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांना पत्र लिहून पदमुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्र सोडले आहे. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची व्यक्त केलेली इच्छा म्हणजे ऊशीरा सूचलेले शहाणपण आहे, अशी प्रतिक्रीया रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विनंतीचा केंद्र सरकार विचार करेल आणि त्यांना पदमुक्त करील अशी आशा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केली.

Updated : 2023-01-25T07:08:36+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top