Home > Top News > महाराष्ट्राचा सुपूत्र शहीद, काश्मीरमध्ये चकमकीत वीरमरण

महाराष्ट्राचा सुपूत्र शहीद, काश्मीरमध्ये चकमकीत वीरमरण

महाराष्ट्राचा सुपूत्र शहीद, काश्मीरमध्ये चकमकीत वीरमरण
X

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्राचे सुपूत्र नरेश बडोले हे शहीद झाले आहेत. काश्मीरमध्ये तैनात असलेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नरेश बडोले हे गुरूवारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात शहिद झाले.

मुळचे नागपूरचे असलेल्या शहिद बडोले यांच्यावर शुक्रवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते जखमी झाले होते. यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले. शहिद बडोले यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत.

Updated : 25 Sep 2020 10:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top