Home > Election 2020 > मुख्यमंत्र्यांच्या टाइम लाईन मधून बारामती गायब...बारामतीत काय घडलं?

मुख्यमंत्र्यांच्या टाइम लाईन मधून बारामती गायब...बारामतीत काय घडलं?

मुख्यमंत्र्यांच्या टाइम लाईन मधून बारामती गायब...बारामतीत काय घडलं?
X

मुख्यमंत्र्यांनी भाषणा दरम्यान ‘बुरे काम का बुरा नतीजा सुनभाई चाचा और भतीजा’ अशी टीका पवारांवर केली. मुख्यमंत्र्यांनी पवार परिवारावर मोठ्या प्रमाणात टीका केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. या कार्यकर्त्यांनी ‘अजित दादा जिंदाबाद.. एकच वादा अजित दादा’ अशा घोषणा देत महाजनादेश यात्रेत गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

मात्र, यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सर्व महाजनादेश यात्रेचं मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक पेजवरुन थेट प्रसारण केलं जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या आत्तापर्यंतच्या सर्व यात्रेचं थेट प्रसारण मुख्यमंत्र्यांच्या पेजवर आजही तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र, फक्त बारामतीच्याच महाजनादेश यात्रेचा व्हिडीओ काढण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पेजवर महाजनादेश यात्रेचे सर्व ठिकाणचे व्हिडीओ आजही आहेत. फक्त बारामतीचाच व्हिडीओ का काढला असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

https://youtu.be/0A1B6XOEMDw

Updated : 15 Sep 2019 5:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top