उत्पादित आधारित बाजारभावाचा कायदा करा – डॉ. बुधाजी मुळीक

Courtesy : Social Media

अख्खं जग करोनाच्या विळख्यात सापडलेला असताना गोंधळलेल्या कर्जमाफीच्या पेचातून शेतकरी बांधव कसा बाहेर पडेल असा प्रश्न सद्यस्थिती पाहता उपस्थित होत आहे. शेती आणि शेतीचे अर्थकारण अगदी खोलवर समजून घेणं गरजेचं आणि महत्वाचे आहे. कर्जमाफीच्या विळख्यात आधीच अडकलेला शेतकरी आता करोनाच्या संकटात सापडला आहे. केंद्र सरकारने जरी शेतीविषयक पॅकेज जाहीर केलं असलं तरी शेतकऱ्यांच्या पदरात कधी आणि किती प़डणार आहे हे तर वेळच सांगेल.

महाराष्ट्र शासन कृषीरत्न-कृषीभूषन पुरस्कारित डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी शेती आणि शेतकरी कसा कर्जात बुडाला यावर विश्लेषण करतान सांगतात की, सरकारने शेतकऱ्याला लागेल तेवढं कर्ज कधीच दिलं नाही. जागतिककरणाची भाषा प्रत्येकाने केली परंतु जगात काय केलं जात हे कुणीच पाहिलं नाही. शेतकऱ्यांसाठी कोणताही कायदेशीर आराखडा कधी तयार करण्यात आला नाही जर उत्पादित आधारित बाजारभावाचा कायदा दूधापासून ते कोथिंबरपर्यंत असता तर शेतकरी हा रोजगाराकरिता शहरात आलाच नसता.

जपान, ब्राझील सारख्या देशांनी कायदे केले की, शेतकऱ्यांना उत्पादन, उत्पन्न यांमध्ये जे काही नुकसान होतं ती सर्व नुकसान भरपाई देण्याचा कायदा केला. एकंदरित आपल्याकडेही शेती उत्पन्न धोक्यातील व्यवस्थापन असणे फार गरजेचं आहे. तसेच उत्पादित आधारित बाजारभावाच कायदा जर केला तर अन्नदात्याचे संरक्षण होईल. एकंदरित डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी कर्जमाफीच्या विळख्यात अडकलेला शेतकरी कसा बाहेर पडणार आणि शेतीचं भविष्य यावर महत्वपूर्ण विश्लेषण केलं आहे नक्की पाहा हा व्हिडिओ…