Home > मॅक्स व्हिडीओ > किती पालकांना असं वाटतं की, आपला मुलगा वैज्ञानिक व्हावा?

किती पालकांना असं वाटतं की, आपला मुलगा वैज्ञानिक व्हावा?

किती पालकांना असं वाटतं की, आपला मुलगा वैज्ञानिक व्हावा?
X

भारतात संशोधनाचं प्रमाण कमी आहे. संशोधनाचं प्रमाण वाढवण्यासाठी विद्यार्थ्यामध्ये त्यांच्या बालपणापासूनच जिज्ञासू वृत्ती वाढवणं गरजेचं आहे. ती एकाकी निर्माण होत नाही. या संदर्भात संज्ञापन अभ्यास विभागाचे प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना आपले विचार व्यक्त केलं.

ते म्हणतात... कोणतंही संशोधन करताना त्याचा पाया मजबूत असायला हवा. मुळात जेव्हा आपण भारतातील संशोधनाचा विचार करतो. तेव्हा दोन गोष्टींचा पाया आपल्या बालपणीचं घातला गेलेला असावा. एक म्हणजे... कुतुहूल आणि दुसरी म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन आणि वस्तुनिष्ठ विचार.

आपल्या प्राथमिक शाळेत या गोष्टीवर भर दिला जातो का? आपली प्राथमिक शिक्षण व्यवस्था कुतुहूल निर्माण करणारी नाही. त्यामुळं पुढे जाऊन संशोधनात मुलं तसा विचार करत नाही. वैज्ञानिक दृष्टीकोन आणि वस्तुनिष्ठ विचार असणारी व्यक्ती भावनेला महत्त्व देत नाही. संशोधनात भावनेला महत्त्व नसतं. आपल्याकडे भावनिकता अधिक आहे.

चीन ला जेव्हा संशोधनाचं महत्त्व समजलं तेव्हा चीनने विद्यापीठ लेव्हलला आणि इंस्टीट्यूट लेव्हलला गुंतवणूक केली. तेव्हा ते इतर देशात संशोधनाला गेले होते. तेव्हा त्यांनी तात्काळ 10 ते 15 हजार लोकांना चीन मध्ये आणलं. त्यांना मोठ्या प्रमाणात सुविधा दिल्या. मोठ्या इंस्टीट्यूट उभ्या केल्या. अशा प्रकारे आपल्याकडे होताना दिसत नाही. आपल्या देशातील मोठ्या प्रमाणात लोक बाहेरच्या देशात जाऊन रिसर्च करत असतात.

गेल्या पाच वर्षापूर्वी संशोधनात चीन कुठेच नव्हता. मात्र, सध्या जर आपण संशोधनाच्या बाबतीत विचार केला. तर जगातील टॉप 5 विद्यापीठापैकी 3 विद्यापीठ चीनचे आहेत. त्यानंतर दोन अमेरिकेचे आहेत. हे का झालं? चीन ने यासाठी हेतूपूर्वक प्रयत्न केलं. त्यासाठी त्यांनी भारतासारख्या देशाच्या मार्केटचं संसोधन केलं. वस्तुची निर्मिती केली.

आपल्याकडे मुलं प्रश्न विचारतच नाही. त्यांना प्रश्नचं पडत नाही का? किंवा त्या पद्धतीचं वातावरण आपल्याकडे नाही. हे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. संस्थांवर आहे. मात्र, यासाठी शासनाला आर्थिक अनुदान करणं गरजेचं आहे. मात्र, कुतुहूल आणि वैज्ञानिक दृष्टीकोन आणि वस्तुनिष्ठ विचार निर्माण करण्याची जबाबदारी प्राध्यापकांची आहे. प्राथमिक स्तरावरील उच्च प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होणं गरजेचं आहे.

यासाठी आपला सामाजिक पाया देखील कमी पडतो. खरं तर आपल्या येथील किती पालकांना असं वाटतं की, आपला मुलगा वैज्ञानिक व्हावा. किंवा आपल्या समाजात आपण वैज्ञानिकांना महत्त्व देतो का? याचा ही विचार करणं गरजेचं आहे. असं मत संदीप गिऱ्हे यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना व्यक्त केलं आहे.

Updated : 4 Aug 2020 7:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top