Home > मॅक्स व्हिडीओ > मराठा समाजातील मागसलेपणाचा इतिहास : सुनिल कदम

मराठा समाजातील मागसलेपणाचा इतिहास : सुनिल कदम

मराठा समाजातील मागसलेपणाचा इतिहास : सुनिल कदम
X

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजातून संताप व्यक्त केला जात आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती का मिळाली? मराठा आरक्षणासाठी सरकार नेमकं काय करतेय? खरचं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का? मराठा समाजाला का हवंय आरक्षण? काय आहे मराठा समाजातील मागसलेपणाचा इतिहास?

आर्थिक, शैक्षणिक, नोकरी आणि शेती क्षेत्रात मराठा समाज का आहे मागे? मराठा समाजाचे प्रतिनिधित्व आणि सरकारची भूमिका काय? 50 टक्क्याच्या आरक्षणाचं काय आहे गणित? ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अट्टाहास का? आरक्षणासाठी ओबीसी आणि मराठा समाजात भांडणं लावून देण्याचा कोण करतंय प्रयत्न ?

सुप्रीम कोर्ट किंवा राज्य सरकार यांनी मराठा समाजाला आरक्षण न देता ते केंद्र सरकारने दिलं पाहिजे जेणे करुन गुज्जर, जाट, मराठा इ. राज्यातील मागासवर्गीयांना आरक्षण मिळेल. असं मत सामाजिक कार्यकर्ते सुनिल कदम यांनी व्यक्त केलं आहे. काय आहे आरक्षणाचा गोंधळ आणि कसं मिळेल मराठा समाजाला आरक्षण जाणून घेण्यासाठी पाहा सुनिल कदम यांचे सखोल विश्लेषण

Updated : 19 Sep 2020 5:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top