Home > मॅक्स व्हिडीओ > विद्यार्थीदशेत कोणी खासदार किंवा प्रधानमंत्री झालेलं तुम्ही ऐकलं आहे का ?

विद्यार्थीदशेत कोणी खासदार किंवा प्रधानमंत्री झालेलं तुम्ही ऐकलं आहे का ?

विद्यार्थीदशेत कोणी खासदार किंवा प्रधानमंत्री झालेलं तुम्ही ऐकलं आहे का ?
X

विद्यार्थीदशेत कोणी खासदार किंवा प्रधानमंत्री झालेलं तुम्ही ऐकलं आहे का ? पुणे येथे अशाच एका नावीन्यपूर्ण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांना संसदीय कार्य प्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव यावा, यासाठी दरवर्षी एच.डी. देसाई महाविद्यालयाच्या वतीने अभिरूप संसद स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या स्पर्धेत पुण्यातील अनेक नामांकित महाविद्यालय सहभागी होतात. यावर्षी मॉडर्न महाविद्यालयाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले असून या विद्यार्थ्यांनी लोकसभा अध्यक्ष, प्रधानमंत्री, विरोधी पक्ष नेता या व अशा असंख्य भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून साकारले आहेत. या विद्यार्थ्यांचा या स्पर्धेतील अनुभव कसा होता? ही प्रक्रिया नेमकी कशी होती ? यासंदर्भात पुणे येथील मॉर्डन महाविद्यालयातून थेट आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी.....

Updated : 2 May 2022 1:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top