Home > News Update > धक्कादायक: महिला खच्चीकरणाचे गुजरात मॉडेल

धक्कादायक: महिला खच्चीकरणाचे गुजरात मॉडेल

धक्कादायक: महिला खच्चीकरणाचे गुजरात मॉडेल
X

कायद्यासमोर सगळे समान असे आपली राज्यघटना सांगते. पण राजकारण्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हे कायदे धाब्यावर बसवले गेल्याचे अनेक प्रकार घडतात. पण कोरोनासारख्या गंभीर संकटकाळात नियम धाब्यावर बसवणाऱ्या मंत्र्याच्या मुलाला जाब विचारला म्हणून एका महिला पोलीस कॉन्स्टेबलला नोकरी सोडावी लागली आहे.

विकासाचे मॉडेल म्हणून मिरवणाऱ्या गुजरातमधल्या सुरतमध्ये हा प्रकार घडला आहे.

गुजरातमध्ये लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी सुरु असताना आरोग्य राज्यमंत्री कुमार कानाणी यांचा मुलगा प्रकाश आपल्या वडिलांची गाडी घेऊन त्याच्या मित्रासोबत बाहेर मास्क न लावता फिरत होता. म्हणून त्याला कर्तव्यदक्ष महिला कॉन्स्टेबल सुनिता यादव यांनी हटकलं आणि त्याला जाब विचारला म्हणून या महिला कॉन्स्टेबलला राजीनामा द्यावा लागल्याचा आरोप दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी केला आहे. स्वाती यांनी या महिला कॉन्स्टेबलचा आरोग्यमंत्र्यांसोबतच्या फोनवरील चर्चेचा व्हिडिओही ट्विट केला आहे.

दरम्यान लॉकडाऊन असतानाही मास्क न वापरता फिरणाऱ्या प्रकाशला सुनिता यादव यांनी मास्क बाबत विचारले असता प्रकाशने सुनिता यांना वर्षभर याच ठिकाणी ड्युटी लावेल, अशी धमकीही दिली होती.

Updated : 13 July 2020 3:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top