जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना पासून आपण काय धडे घेतले? महेश झगडे

गेल्या काही महिन्यापासून कोविड -१९ हा विषाणू जगभर धुमाकूळ घालत आहे. ३० जानेवारी २०२० ला जागतिक आरोग्य संघटनेनं जागतिक आरोग्याची आणीबाणी जाहीर केली होती. याला ३ महिने पूर्ण झाली आहे. अद्यापही करोनाचे संकट जगावर आहे. त्यामुळे लॉकडाऊनचं पर्व जगभरात सुरु आहे.

या संकटाने जगाची अर्थव्यवस्था खिळखिळी करुन टाकली आहे. करोना व्हायरसचा धोका कधी संपणार याची कल्पना नाही. या सर्व पातळीवरती करोना व्हायरसने जगाला काय शिकवलं याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. सध्या करोनानंतरच जग कसं असणार आहे यावर सर्वत्र चर्चा सुरु आहे. परंतु करोनाने काय धडा दिला आणि याचा वैयक्तिक, सामाजिक. देश आणि जागतिक पातळीवर विचार करण्याची गरज आहे. कोण-कोणते धडे आपल्याला करोनाने शिकवले आणि जागतिक पातळीवरील प्रशासकीय व्यवस्था कशी कोलमडली आणि तिला रुळावर आणण्यासाठी काय केलं पाहिजे सांगतायेत माजी सनदी अधिकारी महेश झगडे… पाहा हा व्हिडिओ

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here