Top
Home > Max Political > तिघाडीला नेते फुटण्याची भीती म्हणून बातम्या पेरल्या- राम कदम

तिघाडीला नेते फुटण्याची भीती म्हणून बातम्या पेरल्या- राम कदम

तिघाडीला नेते फुटण्याची भीती म्हणून बातम्या पेरल्या- राम कदम
X

भाजपमध्ये (BJP) ओबीसी नेत्यांना डावललं जात नसुन भाजपचे सर्वाधिक आमदार हे ओबीसी मधुनच आहेत. त्यामुळे आमच्यामध्ये कोणीही नाराज नाही. एकनाथ खडसेही (Eknath Khadse) नाराज नसुन उलट तिघाडीमधुन नेते फुटण्याची भीती आहे म्हणुन अशा प्रकारच्या बातम्या तिघाडीकडुन माध्यमांमध्ये पेरल्या जात असल्याचं मत भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी व्यक्त केलं आहे.

हे ही वाचा...

आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या कामाला खरचं स्थगिती मिळाली का?

दिल्लीतील अनाज मंडी येथे भीषण आग; 43जणांचा मृत्यू

जेव्हा बलात्कार पिडीतेचेच एनकाऊंटर केले जाते – प्रा. हरी नरके

सध्या भाजपाचे अनेक दिग्गज नेते नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सतत चर्चेत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यांसोबतचे त्यांचे वाद आता अधिकच प्रकर्षाने समोर येताना दिसतायत. पंकजा मुंडे याही भाजप नेत्यांवर नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मिडीयावरील त्यांच्या पोस्ट अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. या परिस्थितीत ही दिग्गज मंडळी भाजपसोबतच राहावी म्हणुन भाजप पक्षाचे प्रयत्न सूरू आहेत.

Updated : 8 Dec 2019 3:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top