Home > मॅक्स व्हिडीओ > #AgnipathProtests : माजी लष्करी अधिकाऱ्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र

#AgnipathProtests : माजी लष्करी अधिकाऱ्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र

#AgnipathProtests :  माजी लष्करी अधिकाऱ्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र
X

अग्निपथ योजनेच्या संदर्भात आजही उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहून ही योजना रद्द करण्याची मागणी केली आहे. "15 वर्षांनंतर सैनिकाला सेवेतून निवृत्त करू नये. त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्यात नोकरी देण्यात यावी, ही आमची गेली 20 वर्षांपासून मागणी आहे, त्यामुळे अग्निपथ योजनेला विरोध आहे" अशी भूमिका ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मांडली.

शिवाय 4 वर्षांनी निवृत्त झालेल्या अग्निवीरांना जी नोकरी दिली जाणार आहे, ती कशी असेल, सेवानिवृत्त होताना अग्निविराला 40 हजार पगार असणार आहे, तर नव्या नोकरीत त्यांना 40 ते 50 हजार पगार असणार आहे का? याबद्दल मात्र सरकार आणि नोकरी आम्ही देऊ बोलणारे उद्योगपती सोयीस्कररित्या मौन बाळगून आहेत. त्यामुळे एकूणच अग्निपथ योजने बद्दल गोंधळ दिसून येत असल्याची टीका हे निवृत्त अधिकारी करत आहेत.

Updated : 20 Jun 2022 2:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top