Home > मॅक्स व्हिडीओ > भाजपचे मार्च महिन्यातच उमेदवार फायनल झाले होते, खडसेंचा गौप्यस्फोट

भाजपचे मार्च महिन्यातच उमेदवार फायनल झाले होते, खडसेंचा गौप्यस्फोट

भाजपचे मार्च महिन्यातच उमेदवार फायनल झाले होते, खडसेंचा  गौप्यस्फोट
X

भाजपने राज्यात 21 नोव्हेबरला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी 4 उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये भाजपने धक्का तंत्राचा वापर करत खडसे, तावडे, पंकजा मुंडे, बावनकुळे यासारख्या दिग्गज आणि निष्ठावंतांचा पत्ता कट केला आणि वंचित बहुजन आघाडीमधून आलेल्या गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादीतून आलेल्या रणजित सिंह मोहिते पाटील यांना संधी दिली. तसंच राज्याला फारसे परिचित नसलेले प्रविण दटके आणि डॉ. अजित गोपछडे यांना संधी दिल्यानं 42 वर्षापासून भाजपचं काम करणाऱ्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर टीका केली आहे.

या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र चे विशेष प्रतिनिधी संतोष सोनवणे यांनी एकनाथ खडसे यांच्याशी बातचित केली असता,

भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र, या नावाऐवजी 4 नाव केंद्रातून आल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. वास्तविक जेव्हा या 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

तेव्हा त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरील तारखा पाहिल्या असता, 20 मार्च, 12 मार्च अशा आहेत. याचा अर्थ असा होता की, मार्च महिन्यातच यांना तुमची उमदेवारी फायनल असल्याचं सांगण्यात आलं. म्हणूनच त्यांनी NOC वैगरे सर्व काढून ठेवल्या. पार्लमेंटरी बोर्ड यांच्या घरातच आहे का? असं म्हणत फडणवीस यांचं नाव न घेता खडसे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

Updated : 12 May 2020 11:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top